
बीड, 30 एप्रिल, (हिं.स.)। अजित पवारांच्या सहवासामुळेच राजकीय दिशा बदलली. राजकारणात मोठा झालो तो फक्त अजित पवारांमुळेच. त्यांनी मनापासून आदेश दिला असता तर लोकसभा लढवली नसती, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
विजयानंतर अभिनंदनाचा पहिला फोनही त्यांनीच केला, खासदार म्हणून माझी प्रत्येक मागणी मान्य केली, असे सोनवणे म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अजित स्मृती व्याख्यानमालेचे पुष्प आणि त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी सोनवणे बोलत होते. आपल्या कारखान्यावर फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असून तेही त्यांनीच दिले. अजित पवारांसारखा दुसरा नेता होणार नाही असे सोनवणे म्हणाले.
जुलै महिन्यात त्यांच्या जन्मदिवशी येडेश्वरी साखर कारखान्यावर अजित पवारांच्या भव्य स्मारकाचे काम सुरु होऊन २८ जानेवारीला त्याचे उद्घाटन होईल. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या अॅड. हेमा पिंपळे, डॉ. अरुण बडे, खोखोच्या राष्ट्रीय प्रशिक्षक चित्रा आगळे, धनंजय गुंदेकर, वसंत मुंडे, संतोष मानूरकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis