छ. संभाजीनगर - पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली आहे. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 01 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 67
छ. संभाजीनगर - पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण


छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली आहे. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 01 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 67 वा समारंभ हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

67 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न न औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे शुक्रवार, दि. 01 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.

सकाळी 8.25 ते 8.30 या वेळेत पोलीस परेड संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 8.30 ते 8.35 या वेळेत पालकमंत्री श्री. झिरवाळ हे स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत. त्यानंतर विविध पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमापूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये वा आस्थापनांतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करावा.

सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande