
अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)।अमरावती शहरातील नवसारी परिसरात असलेल्या एका प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले असून दूरवरूनही ही आग दिसून येत आहे. गोडाऊनमध्ये साठवलेले प्लास्टिक पूर्णतः जळून खाक झाले असून मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भर उन्हात तापमान 46 अंशांपेक्षा जास्त असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण ठरत आहे. अग्निशमन दलाचे जवान कठीण परिस्थितीत युद्धपातळीवर काम करत असून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी