डॉ. प्रतिभा अशोक थोरात यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
बीड, 30 एप्रिल (हिं.स.)। केज विधानसभा मतदारसंघातील डॉ. प्रतिभा अशोकराव थोरात यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे बीड
डॉ. प्रतिभा अशोक थोरात यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश


बीड, 30 एप्रिल (हिं.स.)। केज विधानसभा मतदारसंघातील डॉ. प्रतिभा अशोकराव थोरात यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना बीड लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, मराठवाडा सचिव अशोकराव पटवर्धन आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, स्वप्निल गलधर यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. थोरात यांच्यासोबत उद्धव दळवी, प्रमोद पाटील, राजा शेख, नंदकुमार कावळे आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनीही अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे केज मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande