
सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहर गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी दीपक गजानन जाधव यांना प्रशंसनीय सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान असणारे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. उद्या (शुक्रवारी) १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांना हे पदक पदक प्रदान केले जाणार आहे.
जाधव हे 2008 मध्ये शहर पोलीस दलात भरती झाले. सध्या ते शहर गुन्हे शाखेतील अंगुली मुद्रा विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत एकूण १३० बक्षिसे मिळाली आहे. ४५ गुन्हे उघडकीस आणून त्यातील ३ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड