जिल्हा सैनिक कल्याण संघटकांचे खेड, चिपळूण येथील दौरे जाहीर
रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /वीर नारी / वीर माता/वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांचे मे 2026 मध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्ह
जिल्हा सैनिक कल्याण संघटकांचे खेड, चिपळूण येथील दौरे जाहीर


रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /वीर नारी / वीर माता/वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांचे मे 2026 मध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

सोमवार, 4 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे कल्याण संघटक राहुल काटे आणि मंगळवार 5 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे अ. शा. कल्याण संघटक सुनील कदम दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार 11 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार 12 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे यांचा दौरा असेल. सोमवार 18 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार 19 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार 25 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार 26 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे अ. शा. कल्याण संघटक सुनील कदम हे दौऱ्यावर असणार आहेत.

या दौऱ्यामध्ये अभिलेख कार्यालयविषयक, पेन्शनविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्यासोबत www.mahsainik.maharashtra.gov.in वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केलेली पावती, डिस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ.ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल फोन आणावा व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande