डोंबिवली - इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशने जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या मागण्या
डोंबिवली, 30 एप्रिल (हिं.स.)। इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे गुरुवारी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांच्या विविध गंभीर प्रश्नांबाबत सविस्तर मागण्या केल्या. या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन निश
Photo1


डोंबिवली, 30 एप्रिल (हिं.स.)। इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे गुरुवारी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांच्या विविध गंभीर प्रश्नांबाबत सविस्तर मागण्या केल्या. या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन निश्चित कार्यवाही करावी अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याची माहिती इंडिपेन्डन्ट स्कूल मॅनजमेन्ट असोशिएशन, ठाणे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी दिली आहे.

इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन माध्यमातून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, आर.टी.ई. शुल्क भरपाई तात्काळ व नियमित देण्यात यावी. आर.टी.ई. विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याबाबत शासनाची स्पष्ट भूमिका जाहीर करावी. अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई. ठाणे, कल्याण डोंबिवली, महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः दिवा शहरात १०० हून अधिक अनधिकृत शाळा कार्यरत आहेत. अशा शाळांची यादी तात्काळ जाहीर करावी व त्या शाळा त्वरित बंद कराव्यात. शैक्षणिक संस्थांविरोधात होणाऱ्या अपप्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस यंत्रणा निर्माण करावी. चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शिक्षकांवरील बी.एल.ओ. व इतर गैर शैक्षणिक कामे तात्काळ रद्द करावी. शिक्षकांना निवडणूक संबंधित (BLO) व इतर शासकीय कामांमध्ये गुंतविल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिक्षक व संस्थाचालकांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर संरक्षण शाळांमध्ये होणाऱ्या अनुचित हस्तक्षेप, दबाव यापासून संरक्षणासाठी स्वतंत्र कायदेशीर तरतूद करावी. तक्रारींसाठी स्वतंत्र

हेल्पलाइन व संरक्षण यंत्रणा उभी करावी. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या सर्व मागण्या या केवळ संस्थांच्या हितासाठी नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे आपण या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन निश्चित कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही म्हटले आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande