सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी
पुणे, 30 एप्रिल (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, सेवा धर्म आणि ग्रामविकासाचे उद्गाते संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सरस्वती सभागृहामध्ये वित्
Nsns


पुणे, 30 एप्रिल (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, सेवा धर्म आणि ग्रामविकासाचे उद्गाते संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सरस्वती सभागृहामध्ये वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, उपकुलसचिव श्री प्रदीप कोळी यांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करणारे आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande