
परभणी, 30 एप्रिल, (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत केंद्र व राज्य शासन यांच्या विविध योजना, समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना मातंग समाजातील बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंगळवार, दि. 5 मे 2026 रोजी परभणी शहरातील कारेगाव रोड येथील जायकवाडी वसाहत परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील मातंग व तत्सम 12 पोटजातीतील समाज बांधवांसाठी असणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यशाळेस सदर विभागांचे अधिकारी व कर्मचारी योजनांची माहिती देण्याकरीता उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेस समाजातील नागरिक, युवक, युवतींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis