कोल्हापूरमध्ये रुग्णवाहिकांचे दर निश्चित
वाहनांमध्ये दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक कोल्हापूर, 30 एप्रिल (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 14 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित केले असून, हे दर प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक असल्या
कोल्हापूरमध्ये रुग्णवाहिकांचे दर निश्चित


वाहनांमध्ये दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक

कोल्हापूर, 30 एप्रिल (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 14 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित केले असून, हे दर प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक असल्याचे निर्देश सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिले आहेत.

प्राधिकरणाने ठरवलेल्या दरांनुसार विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांसाठी भाडे संरचना पुढीलप्रमाणे आहे:

मारुती व्हॅन रुग्णवाहिका

20 किमी किंवा 2 तासांसाठी : 450 रुपये

प्रति किमी (इंधनसहित) : 12 रुपये

प्रति दिवस (24 तास, 100 किमी मर्यादा) : 3000 रुपये

मासिक भाडे: 90,000 रुपये

टाटा सुमो व मेटॅडोर प्रकारातील रुग्णवाहिका

20 किमी किंवा 2 तासांसाठी: 600 रुपये

प्रति किमी (इंधनसहित): 14 रुपये

प्रति दिवस (24 तास, 100 किमी मर्यादा): 3500 रुपये

मासिक भाडे: 1,05,000 रुपये

टाटा 407, स्वराज माझदा (टेम्पो, ट्रॅव्हलर, विंगर) आधारित रुग्णवाहिका

20 किमी किंवा 2 तासांसाठी: 700 रुपये

प्रति किमी (इंधनसहित): 20 रुपये

प्रति दिवस (24 तास, 100 किमी मर्यादा): 4500 रुपये

मासिक भाडे: 1,35,000 रुपये

वातानुकूलित रुग्णवाहिका

20 किमी किंवा 2 तासांसाठी: 900 रुपये

प्रति किमी (इंधनसहित): 19 रुपये

वातानुकूलन सेवा सुरू असल्यास वरील दरांवर 10 टक्के अतिरिक्त आकारणी

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी हे दरपत्रक प्रत्येक रुग्णवाहिकेत दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.--------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande