अमरावतीत एसआयआर अभियानाला मतदारांचा थंड प्रतिसाद, बीएलओंचा प्रचार प्रसारासाठी आटापिटा
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.) मतदारयादीच्या सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम अभियानाला मतदारांचा थंड प्रतिसाद लाभत असल्याने बीएलओंचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रचंड आटापिटा सुरू आहे. एसआयआर विशेष सखोल पुर्ननिरीक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्यात मतदारयादीचा
अमरावतीत एसआयआर अभियानाला मतदारांचा थंड प्रतिसाद, बीएलओंचा प्रचार प्रसारासाठी आटापिटा


अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)

मतदारयादीच्या सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रम अभियानाला मतदारांचा थंड प्रतिसाद लाभत असल्याने बीएलओंचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रचंड आटापिटा सुरू आहे. एसआयआर विशेष सखोल पुर्ननिरीक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्यात मतदारयादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याची पूर्वतयारी म्हणून सध्या आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ प्रत्येक मतदाराच्या नावाची २००२ च्या मतदारयादीशी जुळवणी करीत आहेत. तसेच मतदारयादीतील अस्पष्ट फोटो, चुकीचे तपशील याचीसुद्धा दुरुस्ती करीत आहेत. ज्या मतदारांचे स्वतःचे नाव २००२ च्या मतदारयादीत नव्हते, त्यांचे वडील किंवा आई यांची नावे त्या यादीत सापडणे आवश्यक आहे. मतदारयादीचे सखोल पुर्ननिरीक्षण कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मतदारयादी नव्याने बनविली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराकडून मतदारयादी माहिती फॉर्म भरून घेतला जाणार आहे. अशावेळी प्रत्येक मतदाराने बीएलओला कागदपत्रे व फोटो उपलब्ध करून द्यावे आणि या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

सुनांसाठी महत्त्वाचे आवाहन एसआयआर अंतर्गत सुनांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुनेचे आई-वडिलांचे नाव, २००२ मध्ये राहत असलेले ठिकाण गाव, तालुका, जिल्हा, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदारसंघ क्रमांक, मतदारयादी भाग क्रमांक, अनुक्रमांक अशाप्रकारची आपली माहिती अचूक मतदानासाठी आवश्यक आहे. आपल्याकडे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आल्यावर ही माहिती त्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande