
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।
शिवसेनेचे नवनियुक्त अकोला लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार राजन साळवी यांनी आज नियुक्तीनंतर प्रथमच अकोला दौऱ्यावर आले असता शिवसेनेचे जुने जाणते जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन दिवसभर झालेल्या बैठकी व जिल्हा संघटने संदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन क्षमतेनुसार जबाबदाऱ्या देण्यात येतील व संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार राजन साळवी यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे