अकोल्यात सम्राट अशोक यांची भव्य रांगोळी
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)। सम्राट अशोक यांच्या २,३३० व्या जयंतीनिमित्त विशाल महाकाय रांगोळीचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तिक्ष्णगत मल्टिपरपझ वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या पुढाकारातून पंचशील नगर आणि न्यू तापडिया नगर परिसरातील चक्रवर्ती सम्राट अशोक
Photo


अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।

सम्राट अशोक यांच्या २,३३० व्या जयंतीनिमित्त विशाल महाकाय रांगोळीचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तिक्ष्णगत मल्टिपरपझ वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या पुढाकारातून पंचशील नगर आणि न्यू तापडिया नगर परिसरातील चक्रवर्ती सम्राट अशोक प्रवेशद्वारासमोर तब्बल ३५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची भव्य विलक्षण महाकाय रांगोळी साकारण्यात आली. या महाकाय रांगोळीचे ड्रोन चित्रीकरण सगळ्यांना आकर्षित करून जातात. अखंड भारतभर सम्राट अशोक यांचे कार्य व प्रभावाचा अडीच हजार वर्षांपूर्वी प्रसार झाला, त्यांच्या कार्याचा आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यांनी शांती अहिंसेच्या मार्गातून अखंड भारत निर्माण केला, त्यांच्या या कार्याचा व विचारांचा गौरव करून आज युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी त्यांची विशेष रांगोळी साकारण्यात आली. यावेळी अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सम्राट अशोक यांना जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी आपली उपस्थित दाखवीली. विशाल महाकाय अशा रांगोळीतून साकारलेल्या या कलाकृतीचे नागरिकांनी कौतुक केले.

सदर रांगोळीच्या निर्मितीसाठी कलाकार आणि स्वयंसेवकांनी तब्बल सोळा तास अखंड मेहनतीने तब्बल दोन क्विंटल रंगाचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली. रांगोळीमध्ये सम्राट अशोक यांची प्रकृती, धम्मचक्र(अशोक चक्र) आणि अहिंसावादी बौद्ध धम्माचा संदेश दिला आहे. या विशाल महाकाय रांगोळीचे 'बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद व्हायला हवी, अशी चर्चा रांगोळी बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सुरू होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande