मनसेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख हेमंत गडकरी मंगळवारी अकोला दौऱ्यावर
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी गुढीपाडवा या मराठी नूतन वर्षाच्या प्रथम दिवशी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर भव्य मेळावा घेतल्यानंतर सदस्य नोंदणी व संघटनात्मक बांधणीवर जोर देण्याचे ठरविले आहे,
मनसेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख हेमंत गडकरी मंगळवारी अकोला दौऱ्यावर


अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी गुढीपाडवा या मराठी नूतन वर्षाच्या प्रथम दिवशी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर भव्य मेळावा घेतल्यानंतर सदस्य नोंदणी व संघटनात्मक बांधणीवर जोर देण्याचे ठरविले आहे,

पक्षाचे अध्यक्ष व जिल्ह्यातील कार्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे अश्या जिल्हा संपर्क अध्यक्ष पदांच्या नियुक्त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषित केल्या.

राज ठाकरे यांचे विदर्भातील सर्वात जुने सहकारी व मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांची पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे,

हेमंत गडकरी हे १९९० सालापासून म्हणजेच राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहेत २००६ ला मनसे पक्ष निर्माण झाल्यावर ते आजवर अनेकांनी (आमदार प्रवीण दरेकर,राम कदम,वसंत मोरे,वसंत गीते, मुंबई चे उप महापौर संजय घाडी, नाशिक चे मनसेचे महापौर राहिलेले यतीन वाघ, अशोक मुर्तडक ,माजी आमदार शिशिर शिंदे , नितीन भोसले व अन्य ) तसेच विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली मात्र मुंबईतील बाळा नांदगावकर व विदर्भातील हेमंत गडकरी हे सदैव त्यांचेशी एकनिष्ठ राहिले,

नुकतीच श्री.राज ठाकरेंनी त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी काही जुन्या व नव्या सहकाऱ्यांची बैठक घेतली व जिल्हा संपर्क अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्याकडे अकोला जिल्ह्याची संपर्क अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली.

जबाबदारी स्वीकारल्यावर हेमंत गडकरी हे दिनांक ७ व ८ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्हा व शहर तर्फे श्री हेमंतजी गडकरी यांची अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या मुळे जाहिर सत्कार करण्यात येणार आहे,तसेच अकोला जिल्हा व शहर तसेच सर्व विविध मनसे अंगीकृत संघटना

पदाधिकारी व मनसैनिक यांची आढावा बैठक होणार आहे.तरी अकोला जिल्हा व शहरतील पदाधिकारी व मनसैनिक यांनी दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ११ वाजता स्थानिक विश्राम गृह येथे हजर रहावे असे आव्हान जिल्हा अध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, शहर अध्यक्ष सौरभ भगत,राकेश शर्मा,मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड तर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande