अंबाजोगाई आरटीओ कार्यालयाचे लोखंडी सावरगावात स्थलांतर; ६ एप्रिलपासून नवीन इमारतीत कामकाज सुरू
बीड, 05 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आता लोखंडी सावरगाव येथील स्वतःच्या हक्काच्या नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत आहे. या नवीन इमारतीमध्ये सोमवार, ६ एप्रिलपासून सर्व कार्यालयीन कामकाज अधिकृतपणे
अ


बीड, 05 एप्रिल (हिं.स.)।

अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आता लोखंडी सावरगाव येथील स्वतःच्या हक्काच्या नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत आहे. या नवीन इमारतीमध्ये सोमवार, ६ एप्रिलपासून सर्व कार्यालयीन कामकाज अधिकृतपणे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयाचे काम तात्पुरत्या स्वरूपाच्या जागेतून चालत होते, मात्र आता नवीन हक्काची वास्तू मिळाल्याने कामकाजात मोठी सुधारणा होणार आहे. या आधुनिक प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. तसेच वाहन परवाना, नोंदणी आणि इतर तांत्रिक कामे अधिक सुलभ व जलद गतीने पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. नव्या जागेतील प्रशस्त परिसरामुळे वाहन तपासणी प्रक्रियेलाही गती येईल. अंबाजोगाई परिसरातील नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन ६ एप्रिलपासून आपल्या कामांसाठी लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande