आंबेडकर जयंतीनिमित्त मराठवाडा विद्यापीठात ७ ते १४ एप्रिल विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, 05 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन ७ ते १४ एप्रिल काळात करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या काळात १५ विविध कार्यक्रम होणार आहेत. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या म
आंबेडकर जयंतीनिमित्त मराठवाडा विद्यापीठात ७ ते १४ एप्रिल विविध कार्यक्रम


छत्रपती संभाजीनगर, 05 एप्रिल (हिं.स.)।

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन ७ ते १४ एप्रिल काळात करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या काळात १५ विविध कार्यक्रम होणार आहेत.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध स्पर्धा, गीत रजनी, व्याख्याने, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. महोत्सवाची सुरुवात येत्या मंगळवारी (दि.७) ज्ञानस्त्रोत केंद्रामार्फत वाचन सप्ताह आणि पुस्तक प्रदर्शनाने करण्यात येईल. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवारी (दि.८) रोजी विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होईल. याच दिवशी संध्याकाळी नाटयगृहात ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांचे कथाकथन होणार आहे. गुरुवारी (दि.९) विद्यापीठ आरोग्य केंद्र, कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (घाटी) रक्तपेढी यांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. शुक्रवारी (दि.१०) महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. तसेच शनिवारी (दि.११) महात्मा फुले जयंतीनिमित्त माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांचे व्याख्यान होणार आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. रविवारी (दि.१२ ज्ञानस्त्रोत केंद्राच्या माध्यमातून ग्रंथालयात १८ तासांचा वाचन उपक्रम होईल तसेच संध्याकाळी आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या नाटयगृहात ’भीमगीत जलसा’ आयोजित करण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आठवडयाभरात क्रीडा विभागामार्फत बुध्दिबळ, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन सारख्या स्पर्धाही होणार आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रख्यात विचारवंत प्रा.प्रदीप गोखले (पुणे) यांचे व्याख्यान होईल. मा.कुलगुुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. याच वेळी ’गीत भिमायन’ प्रकल्पातील २४ व्या गीताचे लोकार्पण करण्यात येणार आहे. वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले हे गीत कविता कृष्णमूर्ती यांनी गायले आहे. तर प्रा.संजय मोहड यांनी संगीतबद्ध केले आहे. याच दिवशी सायंकाळी चेतनकुमार चोपडे व सहकारी भिमगीत रजनी सादर करणार आहेत. तर मंगळवारी (दि.१४) सकाळी ८ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जयंती महोत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande