अंत्योदयासाठी भाजप कार्यकर्त्यांनी २४x७ जनतेत राहावे -आ. रमेशआप्पा कराड
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता वर्षातील ३६५ दिवस आणि २४ तास जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून
आमदार रमेश कराड


लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)।

भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता वर्षातील ३६५ दिवस आणि २४ तास जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून अंत्योदयाचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन भाजप नेते रमेश आप्पा कराड यांनी केले.

रेणापूर येथील पिंपळफाटा परिसरातील शामराव आकनगिरे कॉम्प्लेक्स येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत शहर मंडल प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी विक्रमकाका शिंदे, शोभाताई आकनगिरे, शिवकन्या गोडभरले, शरद दरेकर, सतीश आंबेकर, महेंद्र गोडभरले, दशरथ सरवदे, तसेच अनिल भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षण वर्गात सुमारे १३० लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तीकेंद्रप्रमुख व बूथप्रमुखांनी सहभाग घेतला.

कार्यकर्ता म्हणजे संघटनेचा कणा

यावेळी बोलताना कराड यांनी स्पष्ट केले की, भाजपाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून प्रशिक्षित कार्यकर्ता ही विचारधारेची खरी ताकद आहे. पुढील ५ ते २५ वर्षांसाठी सक्षम वैचारिक फळी तयार करणे हेच या प्रशिक्षण अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ वंचित, गरीब आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी. योजनांचा प्रचार-प्रसार करताना प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिस्त आणि संघटन बळकट करा

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवण करून देत, त्यांनी रेणापूर तालुक्याला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यात केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळून संघटन अधिक मजबूत करावे, तसेच अपयशातून शिकून यशाचा मार्ग निवडावा, असेही त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण शिबिरात वैचारिक अधिष्ठान, भाजपाचा इतिहास, कार्यपद्धती, सरकारची कामगिरी, सोशल मीडिया यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande