मेळघाटमध्ये शासनाच्या ज्वारी खरेदीत गोंधळ ! शेतकऱ्यांची फरफट, तीन महिन्यांनंतर माल परत
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)। धारणी तालुक्यातील चाकर्दा येथील शेतकरी सुधीर रामलाल झामरकर यांना शासनाच्या ज्वारी खरेदी प्रक्रियेत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांची आर्थिक व मानसिक करकट होत असल्याचे प्रकरण समो
मेळघाटमध्ये शासनाच्या ज्वारी खरेदीत गोंधळ ! शेतकऱ्यांची फरफट, तीन महिन्यांनंतर माल परत


अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)।

धारणी तालुक्यातील चाकर्दा येथील शेतकरी सुधीर रामलाल झामरकर यांना शासनाच्या ज्वारी खरेदी प्रक्रियेत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांची आर्थिक व मानसिक करकट होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झानरकर यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी आपली ज्वारी ऑनलाईन नोंदणी करून २६ फेब्रुडारी रोजी खरेदी केंद्रावर विक्रीस दिली होती. त्यावेळी संबंधित गोडाऊनमधीलग्रेडरकडून तपासणी करून २१ क्विंटल ज्वारी स्वीकारण्यात आली होती.मात्र त्यानंतर एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता त्यांची ज्वारी गावातील एका व्यक्तीच्या धरी हलवण्यात आली. काही दिवसांनी शेतकऱ्याना अचानक 'तुमची ज्वारी घेऊन जा' असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या ज्वारीची आधी तपासणी करून खरेदी करण्यात आली होती, तीच ज्वारी तीन महिन्यांनंतर परत करण्यात आल्याने शेतकरी संभ्रमात पडलाआहेही ज्वारी शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत खरेदी करण्यात आली होती. तरीही या प्रक्रियेत झालेला गोंधळ आणि शेतक-यांशी केलेली वागणूक ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहेयाप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर न्याय न मिळाल्याने झामरकर हे हताश झाले असून सध्या ते२१ क्विटल ज्वारी विक्री केल्यावर आदिवासी विकास महामंडळमार्फत प्रेडरकडून एक महिन्यांनंतर मला फोन आला की तुमची ज्वारी परत घेऊन ज आता सदर ज्वारीचे कार्य कर आणि कुठे न्यायची, असे ग्रेडर म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande