बीड - केज बसस्थानकावर मंगळसुत्र चोरणाऱ्या सराईत महिलेला अटक
बीड, 05 एप्रिल, (हिं.स.)। केज बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र चोरणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला बीड स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. फिर्यादी या नाशिक-लातूर बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ९.५
अ


बीड, 05 एप्रिल, (हिं.स.)। केज बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र चोरणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला बीड स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. फिर्यादी या नाशिक-लातूर बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ९.५ ग्रॅम वजनाचे मिनी गंठन अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित महिला संशयास्पद हालचाली करताना आढळून आली.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमधील माउली नगर परिसरातून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून १ लाख ४२ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही महिला बसस्थानक परिसरात चोऱ्या करण्याबाबत सराईत असून तिच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande