अकोल्यात ऑपरेशन प्रहार; पोलिसांच्या 75 ठिकाणी धाडी
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)। अकोला जिल्ह्यात गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी अकोला पोलिस दलामार्फत ऑपरेशन प्रहार राबविण्यात येत असून अकोला जिल्ह्यात अवैध गावठी व देशी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन प्रहार''अंतर्गत विशेष धडक मोही
Photo


अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।

अकोला जिल्ह्यात गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी अकोला पोलिस दलामार्फत ऑपरेशन प्रहार राबविण्यात येत असून अकोला जिल्ह्यात अवैध गावठी व देशी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन प्रहार'अंतर्गत विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे अवैद्य दारू विरोधात विशेष मोहीम पार पडली.

यादरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पथकांनी एकत्रितपणे ही कारवाई करत अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात केला.या मोहिमेचा उद्देश जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालणे हा होता.या विशेष कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून संशयितांवर लक्ष ठेवले.अवैध दारू तयार करून विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली.पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकूण 75 ठिकाणी कारवाई केली.कारवाईदरम्यान देशी दारूच्या 46 प्रकरणांमध्ये जवळपास 2 लाख 3 हजार 562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गावठी हातभट्टी दारूच्या 29 प्रकरणांमध्ये 5 लाख 99 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.अशा प्रकारे एकूण 75 गुन्हे नोंदवत सुमारे 8 लाख 2 हजार 932 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande