रायगड - शाळकरी मुलीच्या आत्महत्येने म्हसळा हादरला
रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। : म्हसळा तालुक्यातील वरवठणे बौद्धवाडी येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार
Mhasala shaken by schoolgirl's suicide


रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। : म्हसळा तालुक्यातील वरवठणे बौद्धवाडी येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मोबाईलवर दोन अनोळखी मुलांशी बोलत असल्याचे घरच्यांच्या निदर्शनास आले. यामुळे घरच्यांकडून रागावले जाईल या भीतीपोटी तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ मुलीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मुलीच्या आईने म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत मृत्यूची नोंद केली आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव, मोबाईलचा अतिरेक वापर आणि अल्पवयीन मुलांमधील मानसिक तणाव या बाबींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवून त्यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande