दमरेला स्क्रॅपमधून तब्बल २7 कोटींचा महसूल
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील स्टोअर्स विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये स्क्रॅप विल्हेवाटीतून विक्रमी कामगिरी करत संसाधन व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणीमु
दमरेला स्क्रॅपमधून तब्बल २7 कोटींचा महसूल


नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।

दक्षिण मध्य रेल्वेच्या

नांदेड विभागातील स्टोअर्स विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये स्क्रॅप विल्हेवाटीतून विक्रमी कामगिरी करत संसाधन व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे विभागाने तब्बल २६.९७कोटी महसूल मिळवला असून रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर घातली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७५ टक्क्यांनी अधिक असून निश्चित करण्यात आलेल्या की परफॉर्मन्स इंडिकेटर (केपीआय) लक्ष्यापेक्षा तब्बल ८० टक्क्यांनी जास्त आहे. , त्याचे वर्गीकरण आणि वेळेवर विल्हेवाट लावण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे, एकूण ८,२४२ मेट्रिक टन रेल्वे रुळांची स्क्रैप विक्रीद्वारे विल्हेवाट लावण्यात आली असून हे निर्धारित लक्ष्याच्या १४२ टक्के आहे. याशिवाय निकामी स्लीपर्स, बेडशीट्स, वाहने, फोर्कलिफ्ट्स आणि इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande