धर्माबादेत घरगुती गॅसचा तुटवडा; नागरिक त्रस्त
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)। धर्माबाद शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून व्यावसायिकांकडून होत असलेला गैरवापर हे मुख्य कारण असल्याची बाब समोर येत आहे. घरगुती नागरिकांच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन वापरून व्यावसायिक अधिक दराने सिलिं
धर्माबादेत घरगुती गॅसचा तुटवडा; नागरिक त्रस्त


नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।

धर्माबाद शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून व्यावसायिकांकडून होत असलेला गैरवापर हे मुख्य कारण असल्याची बाब समोर येत आहे. घरगुती नागरिकांच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन वापरून व्यावसायिक अधिक दराने सिलिंडर खरेदी करत असल्याने सामान्यांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत.

शहरातील स्वीट भांडार, हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, बार, खानावळ, चहा व फास्टफूड सेंटर तसेच चायनीज स्टॉल्सवर घरगुती गॅस सिलिंडरचा उघडपणे वापर केला जात आहे. काही व्यावसायिक दुसऱ्यांच्या नावावर चार-चार सिलिंडर घेऊन त्याचा साठा करून

व्यावसायिक गॅसपुरवठा बंद असतानाही या व्यावसायिकांचे व्यवसाय नेमके कोणत्या गॅसवर चालतात? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सुमारे २० हजार घरगुती गॅस ग्राहक असताना केवळ १५० व्यावसायिकांची संख्या आहे. मात्र दररोज येणारा ३४० सिलिंडरचा साठा काही तासांतच संपत असल्याने अनेक नागरिकांना गॅस न मिळता परत जावे लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande