
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शैलेश वैजनाथराव ममदापुरे यांना संशोधन निबंध सादरीकरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘युवा वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान अखिल भारतीय शिक्षण प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास परिषद तसेच नेक्सेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला.
त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. आलापुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis