सीमांकन बदलून शेतकऱ्यांना न्याय द्या, माजी महापौरांची अशोक चव्हाणांकडे मागणी
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)। नांदेड उत्तर बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही या भागातील जुन्या रस्त्याचे सीमांकन बदलण्यात आले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वाडी बुद्रुक, पुयणी या भागातील जुन्या नांदेड उत्तर बाह्य वळण रस्त्याच
सीमांकन बदलून शेतकऱ्यांना न्याय द्या, माजी महापौरांची अशोक चव्हाणांकडे मागणी


नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।

नांदेड उत्तर बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही या भागातील जुन्या रस्त्याचे सीमांकन बदलण्यात आले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वाडी बुद्रुक, पुयणी या भागातील जुन्या नांदेड उत्तर बाह्य वळण रस्त्याचे सीमांकन बदलून नवीन अस्तित्वात असलेल्या रस्त्याप्रमाणे सीमांकन निश्चित करण्याचे निर्देश नगर रचना विभागास देण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेविका जयश्री निलेश पावडे यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड शहरातील वाहतुकीवर येणारा ताण कमी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी नांदेडच्या विकासात भर पडावी यासाठी खा. अशोकराव चव्हाण यांच्या नियोजनातून नांदेड शहराला उत्तर बाह्य वळण रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी रस्त्याचा मार्ग निश्चित करण्यात आला होता तालुका न्याय नकाशा प्रसिद्ध केला गेला. प्रादेशिक योजनेप्रमाणे नांदेड तालुक्यातील १७गावांना परिघस्त गावे म्हणून निश्चित केले गेले. ही योजना तयार करत असताना शासनाने नांदेड शहराच्या चारही दिशेने रिंग रोड प्रस्तावित केले होते. त्यापैकी नांदेड उत्तर बाहा वळण रस्ता कौठा -नसरतपूर - हसापूर - वाडी बुद्रुक येथून रस्ता पूर्ण झाला आहे. प्रादेशिक योजना तयार करताना प्रस्तावित उत्तर बाह्य वळण रस्ता वाडी बुद्रुक येथील शेत सर्वे क्रमांक १५६ व १६३ मधून पुयणी गावातून प्रादेशिक योजनेच्या नकाशात दर्शविण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात उत्तर वळण रस्ता मौजे वाडी बुद्रुक येथील शेत क्रमांक ११७ ते १५७ व पुढे मरळक येथील शेत क्रमांक गट क्रमांक १५८ पासून पुढे गेला आहे. सदरील जमिनीचं अधिग्रहण सीमांकन पूर्ण होऊन रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला ही झाला: झाला आहे. परंतु प्रत्यक्षात उत्तर वळण रस्ता हा वाडी बुद्रुक येथील शेत सर्वे क्रमांक ११७ ते १५७ व पुढे मरळक येथील शेतकऱ्यांना १५८ पासून पुढे गेला आहे. सदरील

रस्त्याचे अधिग्रहण सीमांकन पूर्ण होऊन या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असल्याने उत्तर वळण रस्ता अधिग्रहण होत असताना प्रादेशिक योजनेमध्ये नमूद उत्तर बाहेर वळण रस्ता वगळणे आवश्यक होते. प्रादेशिक योजनेतील नकाशात आज पण तो रस्ता रद्द करण्यात आलेला नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यासह नागरिकास तो भाग विकसित करण्यात नगर विभाग नगररचना विभागामार्फत तांत्रिक अडचणी येत आहेत. उत्तर वळण रस्ता पूर्णत्वास येऊन त्या रस्त्यावर वाहतूक सुरू झालेली आहे. यामुळे नांदेड प्रादेशिक योजनेत वाडी बुद्रुक येथील शेत सर्वे क्रमांक १५६ व १६३ मधून पुढे पुयणी शिवारातून उत्तर बाह्य वळण रस्ता प्रादेशिक नकाशावरुन रद्द करून ती जमीन शेजारील झोनमध्ये प्रस्तावित करण्यात यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande