
सोलापूर, 05 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी 'सोलापूर शहर मध्य' विधानसभा प्रमुख (BLA 1) पदी गुरुशांत धुत्तरगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवल्यानंतर धुत्तरगांवकर यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे अचूक काम करणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे ही या पदाची मुख्य जबाबदारी असणार आहे.
गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये कार्याला सुरुवात केली होती. विशेषतः मागील विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी पडद्यामागे राहून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीचे नियोजन आणि संघटनात्मक बांधणीत त्यांनी पडद्याआडून केलेली कामगिरी पक्षासाठी मोलाची ठरली होती. त्यांच्या याच निष्ठेची आणि कष्टाची दखल घेत आता त्यांना अधिकृत पद देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड