
सोलापूर, 05 एप्रिल (हिं.स.)।
अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यांची यात्रा सोमवार पासून सुरू होत असल्याची माहिती माजी सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी दिली.दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा श्री कल्लेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत असून दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता उच्चई (लहान रथ) श्री कल्लेश्वर मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत नेला जातो , दिनाक 7 एप्रिल रोजी १२ वाजता रथावर कळसारोहण करण्यात येणार असून संध्याकाळी ८ वाजता रथोउत्सव होणार आहे. तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम कन्नड नाटक होणार आहे. दिनांक 8एप्रिल रोजी 3 वाजता जंगी कुस्ती चे आयोजन करण्यात आले आहे, व त्यादिवशी रात्री परत कन्नड नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी गोगांव च्या यात्रेनिमित्त येऊन जागृत देवस्थानाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि यात्रा पंच कमिटीला व ग्रामपंचायतला सहकार्य करावे,प्रदूषणमुक्त यात्रा साजरी करून, सर्व शासकीय नियमाचे पालन करून यात्रा जल्लोषात साजरी करणार असे माहिती अध्यक्ष अशोक मुलगे व सचिव संजय सुरवसे यांनी सांगितले.
श्री कल्लेश्वर महाराज यात्रे निमित्त दिनांक 7 व 8 एप्रिल 2026 रोजी महाप्रसदाची सोय करण्यात आल्याचे माहिती कलेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री मधुकर सुरवसे , खजिनदार प्रदीप जगताप, श्री कमलाकर सोनकांबळे व देवस्थान कमिटीने सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड