बीड - ५ एमव्हीएचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर
बीड, 05 एप्रिल, (हिं.स.)। केज येथील १३२ केव्ही उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर दाखल झाला असून, यामुळे वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास
बीड - ५ एमव्हीएचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर


बीड, 05 एप्रिल, (हिं.स.)। केज येथील १३२ केव्ही उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर दाखल झाला असून, यामुळे वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, यामुळे केज शहरासह तांबवा, पिसेगाव आणि सोनीजवळा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाढत्या विजेच्या मागणीमुळे होणारा ओव्हरलोड आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता थांबणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी होणारा त्रास कमी होऊन घरगुती उपकरणेही सुरळीत चालतील. हा ट्रान्सफॉर्मर लवकरच कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती आमदार मुंदडा यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande