लातूर -दप्तर सोडून विद्यार्थ्यांनी अनुभवला 'शासकीय दरबारी' कामकाज !
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)।शालेय सहल म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती गड किल्ले बागा किंवा ऐतिहासिक स्थळे मात्र लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांनी या परंपरेला छेद देत एक आगळावेगळा आदर्श घालून दिला असून त्यां
शैक्षणिक


लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)।शालेय सहल म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती गड किल्ले बागा किंवा ऐतिहासिक स्थळे मात्र लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांनी या परंपरेला छेद देत एक आगळावेगळा आदर्श घालून दिला असून त्यांनी विद्यार्थ्यांना दप्तरासोबत शासकीय कार्यालयामध्ये कामकाज कशा पद्धतीने चालते याचा प्रत्यक्ष अनुभव करून दिला.या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

या शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती चे सर्व विभाग, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, सिद्धी शुगर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. उजना, मस्कली दूध डेरी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, उपजिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषदेचा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र, आठवडी बाजार, लघुउद्योग बांबू काम, लोहार काम, गृह उद्योग, विशेष शाळा पांडुरंग निवासी मूक बधिर विद्यालय अहमदपूर इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासकीय कामकाजाचे थेट धडे गिरवले.

इयत्ता पहिली ते सातवीच्या जवळपास ८०० विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणची माहिती घेतली. आपण जे दाखले काढतो ते नेमकं कसे तयार होतात, नॉन क्रिमिलियर, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, इत्यादी मिळवण्याची प्रक्रिया, काय असते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले.

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि कुतूहल दिसून आले.

विद्यार्थ्यांची ही जिज्ञासू वृत्ती पाहून उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपले, तहसीलदार उज्वला पांगरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले, कक्ष अधिकारी शैलेश जोशी, नायब तहसीलदार संतोष अनर्थे भारावून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. प्रशासनाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande