
सोलापूर, 05 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान कै.बाबू जगजीवनराम यांच्या जयंती निमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारताचे माजी उपपंतप्रधान कै.बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेस महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक नरसींग असादे, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेविका निर्मला जगंम,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसुळे,हरीश जगंम डॉ. नागनाथ जिद्दीमणी, डॉ. अभिजित पुजारी, सचिन बोगरगे,बोजराज पवार, शेखर सकट आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड