छ.संभाजीनगर शहरातील फळ, भाजी विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ९ एप्रिलला बैठक
छत्रपती संभाजीनगर, 05 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आह
छ.संभाजीनगर शहरातील फळ, भाजी विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ९ एप्रिलला बैठक


छत्रपती संभाजीनगर, 05 एप्रिल (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर शहरातील फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर

आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील गुंतागुंत सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त, संबंधित विकासक आणि याचिकाकर्ते युनियनचे प्रतिनिधी यांची ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्तांच्या शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हा फळ व भाजीपाला विक्रेता युनियनने २०१२ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने दाखल अवमान याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मांडलेल्या तोंडी प्रस्तावानुसार, वादाचे मुद्दे सामंजस्याने सोडवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ९ एप्रिलच्या बैठकीत होणाऱ्या चर्चेचा सकारात्मक निष्कर्ष न्यायालयासमोर ठेवावा लागणार आहे.

असे आहे मूळ प्रकरण औरंगाबाद जिल्हा फळ व

भाजीपाला विक्रेता युनियन यांचे मार्फत उच्च न्यायालयात २०१३ मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेला औरंगपुरा भाजी मंडई पाडण्यात येणार होती. त्यामुळे सदर प्रकरणात खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय देऊन रात्री साडेनऊ वाजेला अंतरिम आदेश पारित केले होते. औरंगपुरा येथील भाजी मंडई रिकामी करून त्या ठिकाणी मोठी इमारत बांधण्यात आली. १५० भाजी विक्रेत्यांना १८ महिन्यात त्यांना नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही भाजी विक्रेत्यांना नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केलेले नाही. २०१५ मध्ये अवमान याचिका दाखल झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande