
पुणे, 05 एप्रिल (हिं.स.)।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील ६७४ गावांमधील ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती देण्यासाठी पीएमआरडीएने विशेष ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. केवळ अर्ज मागवून न थांबता, पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
अभियांत्रिकी विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. अभिजित चौधरी यांनी या सूचना दिल्या. या वेळी प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी आणि अंमलबजावणीला वेग देण्यासाठी ‘शहरस्तरीय तांत्रिक कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञांची पदे तातडीने भरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
‘लाभार्थी आधारित बांधकाम’ आणि ‘भागीदारीतून परवडणारी घरे’ या दोन प्रमुख घटकांसाठी अनुभवी व तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. परवडणाऱ्या घरांसाठी जमिनीची उपलब्धता हा मोठा अडथळा ठरतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु