परळी वैजनाथमध्ये सोमवारी मांस विक्री बंद करा; सामाजिक कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा
बीड, 05 एप्रिल (हिं.स.)।परळी वैजनाथ या पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका तीर्थक्षेत्राची धार्मिक प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक सोमवारी शहरात मांस विक्री आणि सेवनावर कडक बंदी घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी केली आहे. या संद
परळी वैजनाथमध्ये सोमवारी मांस विक्री बंद करा; सामाजिक कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा


बीड, 05 एप्रिल (हिं.स.)।परळी वैजनाथ या पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका तीर्थक्षेत्राची धार्मिक प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक सोमवारी शहरात मांस विक्री आणि सेवनावर कडक बंदी घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. सोमवार हा भगवान शंकराचा पवित्र दिवस असून यादिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात, अशा वेळी शहरात मांस विक्री सुरू असणे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगर परिषदेने यासंबंधीचा ठराव मंजूर करून महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीलाही ही बंदी लागू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा केदारी यांनी दिला असून या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पाठवण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande