बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे - रामदास आठवले
पुणे, 05 एप्रिल (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. त्यामुळे निवडणूक झालीच, त
Ramdas Athvale


पुणे, 05 एप्रिल (हिं.स.)।

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. त्यामुळे निवडणूक झालीच, तर त्यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार आहे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडण्याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्या, असेही त्यांनी नमूद केले.रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी आणि प्रमुख नेत्यांची बैठक येथे पार पडली. या बैठकीला राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस आशा लांडगे, बाळसाहेब जानराव, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, संजय सोनवणे या वेळी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande