बीड - मादळमोहीजवळ भरधाव कारने चार वाहनांना उडवले; जीवितहानी टळली
बीड, 05 एप्रिल, (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे नगर रोडवरील यशराज हॉटेलसमोर एका भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात चारही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाह
अ


बीड, 05 एप्रिल, (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे नगर रोडवरील यशराज हॉटेलसमोर एका भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात चारही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाथर्डी बाजूकडून वेगाने येणाऱ्या एका टाटा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा थरार घडला. या भीषण धडकेत चंद्रकांत आंधळे, शहादेव आंधळे, यादव इंगोले आणि शिगटे यांच्या मालकीच्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशाखापट्टणम हायवेवर नेहमीच वर्दळ असते, अशा गजबजलेल्या ठिकाणी चालकाने वेगाचे भान न राखल्याने हा अपघात ओढवला.

घटनेची माहिती मिळताच संदीप आंधळे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने निष्पापांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande