लातूर शहरात बुलेट वाहनांवरील फटाका सायलेंसर विरोधात विशेष मोहीम
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना
पोलीस कारवाई


लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकां विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande