खेळाडूंकडून नेत्रदीपक कौशल्याचे प्रदर्शन, नांदेडमध्ये सामने खो-खो स्पर्धेत चार संघाची आगेकूच
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मैदानावर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मु
खेळाडूंकडून नेत्रदीपक कौशल्याचे प्रदर्शन, नांदेडमध्ये सामने खो-खो स्पर्धेत चार संघाची आगेकूच


नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मैदानावर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या चार संघाने प्रतिस्पर्धी विद्यापीठ संघावर विजय मिळवून आगेकूच केली आहे. खेळाडूं नेत्रदीपक अशी वेगवान चपळाई, सतत चकवा देणे आदी नेत्रदीपक कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांना आनंद देत राहिले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या मैदानावर आयोजित खो खो (पुरूष) स्पर्धेत पश्चिम विभागातील ५ राज्यातील संघाचा सहभाग आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भास्कर माने यांनी नियोजन केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संघातील अतुल भोसले, अभिषेक भोसले, कुणाल पाळे आदी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे पारुळ विद्यापीठ,

महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा संघाने राजस्थान विद्यापीठ राजस्थान संघाचा पराभव केला. श्री गुरूगोविंद गुरू विद्यापीठ गोध्रा व एपीएस विद्यापीठ, रेवा (मध्यप्रदेश) संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात केली. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी खेळाडूंचा प्रतिस्पापर्धी खेळाडूला बाद करण्यासाठी वेगवान पाठलाग, बचावासाठी हुलकावणी, बाद करण्यासाठी पोल मारणे, लागोपाठ खो देणे आदी कौशल्याचा परिस्थितीनुरूप वापर उपस्थित प्रेक्षकांची वाह वाह मिळविली.

वडोदरा संघावर २ गुणांनी मात केली. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर संघावर ३ गुणांनी मात केली.

राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था, ग्वाल्हेर संघावर २ गुणांनी मात केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाने गुजरात विद्यापीठ, गांधीनगर संघाचा एकतर्फी असा १८ गुणांनी पराभव केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande