लातूर - उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात तुफान दगडफेक
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने
उदगीर शहरात राडा


लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले.

याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे.

पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत.

प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande