सोलापूर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक नाही : सुदीप चाकोते
सोलापूर, 05 एप्रिल (हिं.स.)। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शहर व जिल्हाध्यक्ष पदांचे फेरबदल सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा होत आहे. याबाबत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी या पदासाठी इच्छ
sudeep


सोलापूर, 05 एप्रिल (हिं.स.)।

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शहर व जिल्हाध्यक्ष पदांचे फेरबदल सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा होत आहे. याबाबत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी या पदासाठी इच्छुक नाही आणि यासाठी मी कुठेही कोणतीही मागणी, शिफारस किंवा विनंती केलेली नाही.माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना मला कळतात, पण मी आपणास नम्र विनंती करतो, उद्या-परवा सोलापूरमध्ये येणाऱ्या निरीक्षकांना भेटून किंवा शक्तिप्रदर्शन करून माझ्या नावासाठी आग्रह करू नये. काँग्रेस पक्ष सध्या कठीण काळातून जात आहे, आणि या परिस्थितीत आपल्याला केवळ पद नव्हे तर संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. “एक व्यक्ती – एक पद” या तत्वाचा मी आदर करतो.सध्या मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल/इंडियन ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असून, मला संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत 2029 साठी तयारी करायची आहे.त्यामुळे सोलापूर शहराला अपेक्षित वेळ देणे माझ्यासाठी शक्य होणार नाही.सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी अनेक सक्षम आणि पात्र चेहरे आहेत. पक्षश्रेष्ठी जे कोणाला जबाबदारी देतील, त्यांच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीने उभा राहीन तन, मन आणि धनाने.आज देशात अशी परिस्थिती आहे की सत्ताधाऱ्यांचा काळ सुवर्ण आहे, पण सामान्य जनतेला दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागतो. अशा वेळी काँग्रेसची विचारधारा पुन्हा तळागाळात पोहोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande