लातूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संवाद बैठक संपन्न
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा उदगीरच्या वतीने कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. उदगीर शाखा अध्यक्ष प्रा मनोहर पटवारी, प्रमुख मार्गदर्शक राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सरचिटणीस उत्तर
अंधश्रद्धा निर्मूलन


लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा उदगीरच्या वतीने कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. उदगीर शाखा अध्यक्ष प्रा मनोहर पटवारी, प्रमुख मार्गदर्शक राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार. लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दशरथ भिसे, उदगीर शाखाचे कार्य अध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटिल, उपाध्यक्ष प्रा. बाबूराव माशाळकर, जिल्ह्याचे प्रधान सचिव बलिराम भुकतरे,जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मूडपे गुरुजी, डॉ.जैद हमजा, रामविलास नावंदर,जनार्दन उमरगेकर, गुंडप्पा बागबंदे, संग्राम पताळे, किशोर अंबुलगे, बाबासाहेब चव्हाण, अमृत काळे, तुकाराम गनपुरे, पांडुरंग वाघमारे प्रमोद देवर्षे मलवाडे के आर इत्यादि साथी उपस्थित होते.

स्वागत गीत साथी रघुनाथ मोरे शेल्हाळ यांनी सादर केले. प्रiस्तविक विश्वनाथ मुडपे गुरुजी यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. बाबूराव माशाळकर यानी करून दिला. या बैठकीत राज्य अध्यक्ष संजय बनसोडे यांनी उदगीर शाखेच्या कार्याचा गौरव केला. राजकारण्यांनी नासिक येथील भोंदू बाबा प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे मत नोंदविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आ. मनोहर पटवारी यांनी समारोप करताना युवकांना अनिस कार्यात सहभागी होण्याचेआवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande