सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षांसाठी 'स्वारातीम' विद्यापीठ घेणार परीक्षा
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)। ''स्वारातीम'' विद्यापीठाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेत, एमएच-सीईटी आणि विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा एकाच दिवशी आल्याने निर्माण झालेला पेच सोडवला आहे. या दोन्ही परीक्षांची वेळ एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षांसाठी 'स्वारातीम' विद्यापीठ घेणार परीक्षा


नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।

'स्वारातीम' विद्यापीठाने

विद्यार्थीहिताचा निर्णय घेत, एमएच-सीईटी आणि विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा एकाच दिवशी आल्याने निर्माण झालेला पेच सोडवला आहे. या दोन्ही परीक्षांची वेळ एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली आहे किंवा हुकणार आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र विशेष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण परीक्षा पुढे ढकलल्यास

अंतिम वर्षाच्या निकालाला विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. हे नुकसान टाळण्यासाठी, केवळ ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा 'क्लॅश' होत आहे, त्यांच्यासाठीच विशेष परीक्षेची सोय करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, संबंधित विद्यार्थ्यांनी आपली एमएच सीईटी परीक्षा नियोजित वेळेतच द्यायची आहे. त्यानंतर, या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि उपस्थिती अहवाल प्राचार्यामार्फत १८ एप्रिल २०२६ पर्यंत विद्यापीठात सादर करणे आवश्यक आहे. ही विशेष परीक्षा नांदेड येथील विद्यापीठ मुख्य परिसर, लातूर व परभणी येथील उपकेंद्र आणि हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज अशा निश्चित केंद्रांवर घेतली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande