विदर्भातील वाघांचा सह्याद्रीकडे प्रवास; पाच वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.) विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा वाढल्याने वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता या वाघांचे सह्याद्रीकडे स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (NTCA) परवा
विदर्भातील वाघांचा सह्याद्रीकडे प्रवास; पाच वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील


अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.) विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा वाढल्याने वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता या वाघांचे सह्याद्रीकडे स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (NTCA) परवानगी दिल्याने प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविण्यात आलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे स्थिरावले आहेत. त्यामुळे वनविभागाचा आत्मविश्वास वाढला असून, आता आणखी पाच वाघ पाठविण्याची तयारी सुरू आहे. हे वाघ टप्प्याटप्प्याने विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून सह्याद्रीत हलवले जाणार आहेत.

सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे वाघांची संख्या अत्यल्प झाली होती. निसर्गसाखळी संतुलित राखण्यासाठी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी या प्रकल्पात वाघांचे अस्तित्व अत्यावश्यक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, सह्याद्री परिसरात २५ ते ३० वाघ सहजपणे राहू शकतात.विदर्भात वाघांची संख्या वाढल्याने त्यांच्या अधिवासावर ताण निर्माण झाला असून, प्रादेशिक वर्चस्वासाठी संघर्षही वाढत आहेत. हे टाळण्यासाठी स्थलांतर हा उपाय अवलंबला जात आहे.दरम्यान, सह्याद्री परिसरात वाघांची संख्या वाढल्यास मुंबई, पुणे, ठाणे तसेच कर्नाटकातील पर्यटकांना वाघ पाहण्याची संधी अधिक सहज उपलब्ध होणार आहे.या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांची टीम नुकतीच विदर्भ दौऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आली असून, लवकरच प्रत्यक्ष स्थलांतर प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande