
पुणे, 05 एप्रिल (हिं.स.)।
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता रंगत वाढली असून, लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आता मावळली असल्याचे दिसून येत आहे. ,तसेच आतापर्यंत 19 जणांना आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल, अशी सुरुवातीला चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर विरोधकही उमेदवार देणार नाहीत, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
लक्ष्मण हाके यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने बारामतीत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाके यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यांनी मतदारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त करत, ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु