
सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. माननीय सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री मा.श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थिती तर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हस्ते पक्षाचा ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी आमदार देवेन्द्र दादा कोठे,महापौर श्री विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, मंडळ अध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणी, संघटनशक्ती आणि देशाच्या विकासात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड