४६ वर्षे समर्पणाची… ४६ वर्षे भारतीय जनता पार्टीची!
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयात आयोजित ध्वजारोहण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.“राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः”
sdfg


पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयात आयोजित ध्वजारोहण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.“राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या मूलमंत्रावर कार्यरत असलेला भारतीय जनता पक्ष गेल्या ४६ वर्षांपासून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्य करत आहे. संघटनशक्ती, राष्ट्रभक्ती आणि सेवा या मूल्यांवर उभा असलेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठा आणि प्रभावी राजकीय पक्ष म्हणून उभा आहे. या वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी राष्ट्रसेवा आणि विकासाच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा संकल्प केला.यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव आण्णा तापकीर, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले तसेच भाजपा सर्व सरचिटणीस, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande