
धुळे, 06 एप्रिल (हिं.स.) भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला ४६ वर्ष पुर्ण होऊन ४७ वा स्थापना दिवस धुळे शहरात धुळे शहराचे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर व धुळे शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील स्व. महादेव अंपळकर स्मृती, भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कार्यकत्यारची मोठी उपस्थिती लाभली होती. तसेच आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या येथील मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात पक्ष ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहणाने करण्यात आले. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित कार्यकत्यारमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी मान्यवरांचा व ज्येष्ठ नेते व कार्यकत्यारचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते मदनलालजी मिश्रा, भिमसिंग राजपुत, रवीजी बेलपाठक, खा. सुभाषजी भामरे, आ. राजवर्धनजी कदमबांडे, ज्येष्ठ नेते विजू नाना पाच्छापुरकर, हिरामण आप्पा गवळी, गोपालजी केले, जगदीश झांझेरिया, रामशेठ अग्रवाल, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, विवेक कुलकर्णी, शिवाजीराव काकडे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनीधींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर