लातूर - भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालयात पक्षाचा वर्धापन दिन साजरा
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)।‘राष्ट्र प्रथम’ हा ध्यास मनाशी बाळगून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज लातूर ग्रामीण जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष या नात्याने बस्वराज पाटील यांना झेंडावंदन करण्याचा
भाजप


लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)।‘राष्ट्र प्रथम’ हा ध्यास मनाशी बाळगून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज लातूर ग्रामीण जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष या नात्याने बस्वराज पाटील यांना झेंडावंदन करण्याचा मान लाभला.आजचा दिवस केवळ पक्षाचा वर्धापन दिन नसून, अंत्योदयाचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि त्यागाचा उत्सव आहे.असे प्रतिपादन बस्वराज पाटील यांनी केले

या मंगलमय प्रसंगी जिल्हा कार्यालय परिसर आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या देखण्या सजावटीने नटला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटपाने आनंद द्विगुणित झाला. यावेळी पक्षाचा जाज्वल्य इतिहास तसेच पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या जनकल्याणकारी योजनांवर भाष्य करत उपस्थितांशी संवाद साधला.या सोहळ्यात जिल्हा परिषद गटनेते श्री. रामचंद्रजी तिरुके यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणातून पक्षाचा ४६ वर्षांचा दैदीप्यमान प्रवास उलगडला. माजी खासदार डॉ. सुनीलजी गायकवाड यांनीही शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, जिल्हा परिषद सभापती . कविता गोरे, सदस्य अजिंक्य देशमुख, संगमेश्वर ठेसे, त्र्यंबकजी गुटे, शिरीषजी उटगे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. रोहिदासजी वाघमारे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शहानुर बागवान, शहर जिल्हाध्यक्ष श्री. मुन्ना हाशमी, सौ. उषाताई रोडगे, अमोली निळवदे,. मनिषा नवने, . बसवराज पाटील कौळखेडकर, निळकंठजी मिरखले, सिद्धेश्वर पवार, प्रताप पाटील, रवि चिलमे, . महेंद्र गोडभरले, भागवत गुट्टे, इंद्रजीत गुट्टे, विष्णू कसबे, रामेश्वर चावरे, रमेश पाटील, बसवराजजी रोडगे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन चंद्रप्रकाश हांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल निळवदे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande