
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे आयोजित विशेष व्याख्यान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या गौरवशाली प्रवासाची आठवण जागवली. राष्ट्रसेवा, विकास आणि जनहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन पुढील वाटचालीचा यावेळी दृढ संकल्प करण्यात आला.
या अभिमानास्पद प्रवासाचा भाग असल्याचा आनंद आणि गौरव प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. याप्रसंगी माजी पालकमंत्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर, नगरसेविका प्रेरणा होनराव, रागिणी यादव, नगरसेवक प्रवीणजी कस्तुरे, ऍड दीपक मठपती तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis