लातूर : किनगाव येथे मेंदूविकार तपासणी शिबिर संपन्न; ७६ दिव्यांगांवर झाले उपचार
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे आयोजित शिबिरात ११० रुग्णांची नोंदणी करण्यात आली, ज्यापैकी ७६ जणांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करून त्यांना ३ महिन्यांची औषधे मोफत देण्यात आली. शिबिराची ठळक वैशिष्ट्ये: ७६ रुग्णांवर प्र
आरोग्य शिबीर


लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे आयोजित शिबिरात ११० रुग्णांची नोंदणी करण्यात आली, ज्यापैकी ७६ जणांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करून त्यांना ३ महिन्यांची औषधे मोफत देण्यात आली.

शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:

७६ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार आणि औषध वाटप.

४० लाभार्थ्यांना 'निरामय आरोग्य विमा कार्ड' प्रदान.

३० दिव्यांग व्यक्तींच्या UDID नोंदणीसाठी कागदपत्रे संकलित.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 'संवेदना प्रकल्प' यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. देवाशिष रुईकर यांच्यासह मान्यवरांनी यावेळी रुग्णांना मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande