परभणीत तालुक्यातील दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड काढण्याकरीता 9 एप्रिलला शिबीर
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)। परभणी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील डी.बी.टी. पोर्टलला समाविष्ट असलेले संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनातील लाभार्थींना शासन निर्णय दिनांक
परभणीत तालुक्यातील दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड काढण्याकरीता 9 एप्रिलला शिबीर


परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)।

परभणी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील डी.बी.टी. पोर्टलला समाविष्ट असलेले संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनातील लाभार्थींना शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर २०२५ अन्वये वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. तरी वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी परभणी तालुक्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी दि. 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे वैश्विक ओळखपत्र काढण्याकरिता स्वतः दिव्यांग लाभार्थी यांनी मुळ दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल इ. सह उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार, परभणी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande